आपल्या जिल्ह्यात बुद्धिबळ कितपत खेळला जातो?

 
आज भारताकडे जागतिक दर्जाचे ग्रँडमास्टर आहेत  विश्वनाथ आनंद, प्रग्गनानंद, गुकेश, हरिकृष्णा, गॆस डोममराजू ज्यांनी भारताच्या नावाला chess विश्वात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. परंतु  अजूनही हा खेळ अनेक ग्रामीण भागांमध्ये दुर्लक्षित राहतो. 

बुद्धिबळ हा एक महत्त्वाचा बौद्धिक खेळ असूनही अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे अस्तित्व फारसे जाणवत नाही. काही ठिकाणी तो केवळ शहरांपुरता मर्यादित आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला आपल्या जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये, क्रीडासंस्था, आणि उत्साही गट यांच्याकडे पाहण्याची गरज आहे. 
 
कोणत्या ठिकाणी बुद्धिबळ खेळला जातो. आणि कोणत्या ठिकाणी अजूनही त्याची ओळख नाही. 
हे मूल्यांकन महत्त्वाचे कारण तेच आपल्याला पुढच्या योजना आखण्यासाठी दिशा दाखवते. 
 
बुद्धिबळ हे केवळ डोक्याचा खेळ नसून हा जीवनशैलीचा एक भाग होऊ शकतो आणि तो घडवण्याची सुरुवात आपल्या गावापासूनच करता येते!   

Share your thoughts in the comments below.

Create an account to write a response.

District Vision
Partner